बॉलिवूड अभिनेता शाहिर कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतो. सध्या शाहिद त्याचा आगामी चित्रपट ‘जर्सी’चे चित्रीकरण करत आहे. दरम्यान त्याने एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नुकताच शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो गाडीमध्ये बसला असून गाणे ऐकत असल्याचे दिसत आहे. दरम्यान तो अचनाक विचित्र एक्सप्रेशन देतो. ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. हा व्हिडीओ शेअर करत त्याने त्याने ‘मूड’ असे कॅप्शन दिले आहे.
शाहिदचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने तर ‘शाहिद भावा एनसीबी घरी येईल असे काही करु नकोस’ असे म्हटले आहे. तर काही यूजरने शाहिदची प्रशंसा करत हसण्याचे इमोजी वापरले आहेत.
लॉकडाउननंतर आता शाहिद पुन्हा त्याचा आगामी चित्रपट ‘जर्सी’चे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण डेहराडून येथे सुरु आहे.
‘जर्सी’ हा तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्नानूरी यांनी केले असून हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करत आहेत. शाहिदने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले होते. हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.