सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकची सर्वांनाच उत्सुकता होती. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूरची प्रमुख भूमिका आहे. शाहिदनं या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटाचं नाव ‘कबीर सिंग’ आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं होतं. रिमेकचं दिग्दर्शनही संदीप वांगा करत आहेत.

ट्विटरवर पोस्ट शेअर करत शाहिदने कॅप्शनमध्ये ‘आपल्या आतील कबीर सिंगला शोधण्याचे आवाहन केले आहे.’ हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. गेल्या वर्षीपासून शाहिदनं ‘कबीर सिंग’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. मुंबई- दिल्लीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडणार आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिद या चित्रपटात एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कबीर सिंग’मध्ये शाहिद सोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. ‘एम.एस. धोनी’, ‘लस्ट स्टोरी’ मध्ये कियारानं काम केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं कियारा, शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.