छोट्या पडद्यावरची अभिनेत्री शमा सिकंदरनं ही हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. शमाने काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड जेम्स मिलिरॉनसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. गोव्यात १४ मार्च २०२२ रोजी त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर शमाने तिचं वैवाहिक आयुष्य आणि मुलांविषयी देखील वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा : Raj Thackeray Birthday : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या

शमाने नुकतीच नवभारत टाइम्सला मुलाखत दिली आहे. यावेळी शमा तिच्या लग्नाविषयी आणि मुलांविषयी सांगितलं. “लग्नानंतर माझ्या आयुष्यात मोठा बदल वगैरे झालेला नाही. कारण आम्ही ८ वर्षांपासून एकत्र राहत आहोत, पण हो एक छोटा आणि महत्त्वाचा बदल, नक्कीच झाला आहे. कारण जेव्हा आमचं लग्न होतं होतं तेव्हा आम्ही लग्नाच्या ज्या विधी पार पाडत होतो. त्या साकारताना मनाला एक शांती मिळत होती, सकारात्मकता वाटतं होतं. प्रेम,आनंद या भावनांनी केवळ मन नाही तर सारं वातावरण प्रफुल्लित झालं होतं. जेव्हा दोन मनापासून प्रेम करणारे लोक एकत्र येऊन सेलिब्रेशन करतात तेव्हा, ते आपल्या सभोवतालचं जगही बदलून टाकतात. त्या सकारात्मक विचारांनी, माझं आयुष्य नक्कीच बदललंय असं मी म्हणेन आणि हो आता मी थोडी जबाबदार झालेय”, असं शमा म्हणाली.

आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम

आणखी वाचा : Siddhanth Kapoor Drug Test : ड्रग्स प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शक्ति कपूर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी फक्त…”

शमा पुढे म्हणाली, “ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न यापेक्षा दुसरा आनंद काय आणि तो दिवस आपल्या प्रियजनांच्या, नातेवाईकांच्या, मित्रपरिवाराच्या साथीनं अनुभवणं हा परमोच्च आनंद देणारा क्षण. करोनामुळे लग्न २ वर्ष उशीरा केलं. पण जे झालं ते चांगलं झालं कारण आम्ही आणखी एकमेकांना चांगले ओळखू लागलो.”

आणखी वाचा : राज ठाकरेंच्या वडिलांमुळे मोहम्मद रफी गाऊ लागले मराठी भक्तीगीते

पुढे आई होण्यासाठी म्हणाली, “मी खूप चांगली आई होईन. एका इंग्रजी वृत्तपत्रानं लिहिलं होतं शमाला आई होण्यासाठी लग्न करायची गरज नाही, पण मला वाटतं मुलाला जन्म देणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही आपल्या आयुष्यात सेटल झाले पाहिजे. तर, मुलांचे संगोपन तुम्ही चांगलं करू शकाल. मी आता माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मला वाटतं की मी माझ्या मुलांना चांगलं आयुष्य देईन.”

आणखी वाचा : राज ठाकरे राहत असलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थाचे, फोटो पाहा

पुढे शमा तिच्या होणाऱ्या मुलांविषयी म्हणाली, “मुलगा असो की मुलगी, ते गे असोत की लेस्बियन मला फरक पडत नाही. मला मुलं हवी आहेत, पण त्यांना जन्म कधी द्यायचा किंवा कोणाला जन्म दिलाय हे आमचं सीक्रेट आहे. मी यासंदर्भात बोलणं योग्य समजणार नाही. मला तर मुलं दत्तक घ्यायची होती पण ती संधी मला कोणी दिलीच नाही. पण मला वाटतंय मला जरी मुलं झाली तरी मी त्यानंतर मुल दत्तक घेण्याचा विचार नक्कीच करेन.”