दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे लवकरच रंगमंचावर पुनरागमन करत आहेत. गेले सहा महिने ते कर्करोगाशी झुंज देत होते. कर्करोगाशी त्यांचा लढा यशस्वी झाला असून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत.
राजेश देशपांडे यांच्या ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून ते पुनरागमन करत आहेत. त्यानंतर ते ‘अग्निहोत्र २’ या मालिकेतही झळकणार आहेत. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी कर्करोगाशी कशी झुंज दिली, यावेळी त्यांच्या मदतीला कोण धावून आलं, याबद्दल शरद पोंक्षेंनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणानं सांगितलं.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सहा महिने घेतलेल्या औषधोपचार आणि किमोथेरेपीमुळे आजारातून पूर्णपणे बरे झालो असल्याचे सांगत आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालो असल्याचं त्यांनी सांगितलं.