पोलिसांचे जीवन वाटते तितके सोपे नसते . एक साधारण जीवन जगणारा माणूस आणि एक पोलीस यांच्या आयुष्यात फार तफावत असते. पोलीस दलातील नोकरी म्हणजे इतर नोकऱ्यांसारखी नसते. बाकीच्या नोकऱ्यांमध्ये ड्युटी संपल्यावर कामाशी संबंध संपतो . पण पोलीस हा असा माणूस असतो , जो ड्युटीवर नसतानाही अलर्ट असतो. घरी असताना सुद्धा कर्तव्य आणि जबाबदारी कधीच विसरत नाही. पुरुष अधिकारी असो व स्री अधिकारी. दोघेही अतिशय जिद्दीने त्यांची जबाबदारी पार पडत असतात. या आठवड्यात अश्याच दोन अधिकाऱ्यांच्या शौर्याच्या कथा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ज्यांनी अतिशय हुशारीने आणि जिद्दीने त्यांचे कर्तव्य बजावले. पहिली केस असणार आहे पीसआय राजरामसिंग चौहान या अधिकाऱ्याची , ज्यांनी मिळालेली प्रत्येक केस अतिशय जवाबदारीने आणि जिद्दीने सोडवली. त्यांनी दाखवलेल्या शौर्याच्या दोन कथा या भागात दाखविण्यात येणार आहोत. तर दुसरी कथा आहे महिला पोलीस अधिकारी कल्पना गाडेकर यांची, ज्यांनी चॉकलेट गर्ल म्हणून फेमस झालेल्या एका महिला गुन्हेगारला सापळा लावून  पकडले होते.  दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या शौर्याबद्दल राष्ट्रपती शौर्य पदक प्रदान करण्यात आले. या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये एक साम्य अजून आहे, दोघांचाही ड्युटीच्या पहिल्याच दिवशी गुन्ह्याशी संबंध आला आणि तेवढ्याच ताकदीने त्यांनी हाताळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएसआय राजारामसिंग चौहान, यांनी ड्युटीच्या पहिल्या दिवसापासून जे शौर्य सुरु केले ते कधी थांबलेच नाहीत. पहिल्याच दिवशी, ड्युटीवर रुजू व्हायला जात असताना त्यांनी एका कुविख्यात  गुंडाला, स्वतःच्या दक्षतेमुळे पकडले आणि संपूर्ण पोलीस दलात ते प्रसिद्ध झाले. पोलीस दलात काम करताना यांची वेगवेगळ्या दलात बदली झाली आणि प्रत्येक ठिकाणी  मिळालेली जबाबदारी त्यांनी पूर्ण निष्ठेने निभावली. उपनिरीक्षक असताना इनामदार नावाच्या एका कंपनीच्या मालकाला त्याच्याच नोकराने जीवे मारण्याची धमकी  देत साडे तीन कोटींची खंडणी मागितली. अतिशय हुशारीने सापळा रचत, इनामदारांच्या नोकराला आणि त्याच्या साथीदारांना पकडले. काही दिवसांनी त्यांच्या डोळ्यांदेखत एका ७० वर्षाच्या वकिलावर गुन्हेगारांनी रस्त्यावर तलवारीने वार केले. चौहान अतिशय शौर्याने त्या गुंडाबरोबर एकटेच लढले, त्या गुंडानी त्यांच्यावर सुद्धा तलवारीने वार केले. पण त्या जखमी अवस्थेत जिद्दीने आणि शौर्याने त्यांनी त्या मारेकऱ्यांना जेरबंद केलेच. अश्या या शूर अधिकाऱ्याची कथा तुम्हाला या शुक्रवारी दिनांक २० जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पहायला मिळणार आहे.

महिला अधिकारी  कल्पना गाडेकर ज्यांना ड्युटीच्या पहिल्याच दिवशी डेडबॉडीशी संबंध आला आणि घाबरून त्या राजीनामा देणार होत्या. पण मनातील पोलीस बनण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि घरचा विरोध डावलून महिला असूनही इथपर्यंत केलीली मेहनत लक्षात घेऊन त्यांनी तो निर्णय मनातून काढून टाकला आणि त्यांनतर आजपर्यंत मोठयामोठ्या केसेस हाताळल्या. त्यातील एक लक्षणीय केस होती ती म्हणजे “चॉकलेट गर्ल “ची. रात्रीच्या काळोखात, सुनसान रस्त्यावर गाडीवाल्या लोकांना एक सुंदर मुलगी, लिफ्टच्या बहाण्याने थांबवायची, स्वतःचा वाढदिवस आहे असे सांगून त्यांना चॉकलेट द्यायची आणि बेशुद्ध करून लुटायची. वारंवार ह्या घटना वाढल्याने मीडियाने सुद्धा ह्याची दाखल घेतली. महिला पोलीस अधिकारी कल्पना गाडेकर यांनी सर्वत्र चौकशी केली. पण ही चॉकलेट गर्ल हातात येत नव्हती, शेवटी अतिशय हुशारीने सापळा रचत ह्या चॉकलेट गर्लपर्यंत कल्पना गाडेकर कश्या पोहचल्या आणि चोरांचे हे रॅकेट त्यांनी कसे शोधून काढले, याची ही उत्कंठापूर्वक कथा तुम्हाला  या शनिवारी दिनांक २१ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shauryagatha next episode on chololate girl
First published on: 17-01-2017 at 08:25 IST