गोवा येथे पार पडणाऱ्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सांगलीच्या शेखर रणखांबेच्या ‘पॅम्पलेट’ या लघुपटाची निवड झाली आहे. जगभरातल्या १६ नामांकित चित्रपट महोत्सवांपैकी हा अतिशय महत्वाचा महोत्सव आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वाचे या महोत्सवाकडे आणि त्यातून निवड होणाऱ्या चित्रपटांकडे लक्ष असते. या महोत्सवात आपला चित्रपट निवड व्हावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपट महोत्सवात जगभरातून निवडलेले चित्रपट दाखवले जातात. आठवडाभराच्या या महोत्सवात इंडियन पॅनारोमा या विभागात भारतातून २१ लघुपट आणि २४ पूर्ण लांबीच्या चित्रपटांचा समावेश प्रत्येक वर्षी होत असतो. या वर्षी महाराष्ट्रातून २ पूर्ण लांबीचे आणि ८ लघुपटांची निवड झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातून गेलेल्या आणि ग्रामीण कथानक असलेल्या ‘पॅम्पलेट’ची निवड झाल्यामुळे त्यांच्या पुढच्या कामासाठी नक्कीच बळ देणारं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shekhar rankhambe short film pamphlet selected for iffi goa
First published on: 15-11-2018 at 09:28 IST