शर्लिन चोप्राने सांगितला कास्टिंग काऊचचा कोडवर्ड

शर्लिनने सांगितला तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव

प्ले बॉयच्या मुखपृष्टावर नग्न छायाचित्र देण्याचं धाडस करुन चर्चेत आलेल्या अभिनेत्री शर्लिन चोप्राने तिचा कास्टिंग काऊचच्या अनुभव सांगितला आहे. कलाविश्वात कास्टिंग काऊचविषयी एक खास शब्द वापरला जातो असं तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत काही दिवसापूर्वी अभिनेता आयुषमान खुरानाने त्याचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला होता.

‘हिंदुस्तान टाइम्स’नुसार, कलाविश्वात अनेकांना कास्टिंग काऊच सारख्या भयान प्रसंगाचा अनुभव आला आहे. यामध्येच शर्लिन चोप्रानेदेखील तिचा अनुभव सांगितला आहे. स्ट्रगल काळात एका दिग्दर्शकाने तिला डिनरसाठी बोलावलं होतं. मात्र या डिनरचा नेमका अर्थ काय हे त्यावेळी शर्लिनला समजल्याचं तिने सांगितलं.

“सुरुवातीच्या काळात, अगदी त्यावेळी माझी काहीच ओळख नव्हती. कोणालाचं माझं नावही माहित नव्हतं त्याकाळात मी अनेक निर्माते, दिग्दर्शक यांना माझा अभिनय पाहण्याची विनंती करायचे. मी माझा पोर्टफोलियो घेऊन अनेक निर्मात्यांच्या ऑफिसच्या वाऱ्या करायचे. त्यावेळी माझा पोर्टफोलियो पाहून अनेक जण, हा. चांगला आहे, ठीक आहे, आपण डिनरला भेटूयात, असं म्हणायचे. त्यावेळी मी त्यांना डिनरची वेळ विचारायचे तर ते मला रात्री उशीरा ११ किंवा १२ वाजता सांगायचे”, असं शर्लिन म्हणाली.

पुढे ती म्हणते, “त्यावेळी त्या लोकांच्या डिनरचा खरा अर्थ कॉम्प्रोमाइज करणं हा होता. ज्यावेळी पाच-सहा वेळा मला हा अनुभव आला त्यावेळी मी डिनरचा खरा अर्थ समजले. मला त्या लोकांचा हेतू लक्षात आल्यानंतर कोणी मला डिनरसाठी विचारलं तर मी नकार देत होते.कोणी मला डिनरसाठी विचारलं तर मी डाएट करत असल्याचं उत्तर द्यायचे आणि ब्रेकफास्ट किंवा लंचसाठी मी येऊ शकते असं सांगायचे त्यावर त्यांच्याकडून कोणतंही उत्तर यायचं नाही”.

दरम्यान,शर्लिन चोप्रा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. शर्लिन अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. अनेक वेळा तिच्या बोल्ड फोटोशूट केल्यामुळे टीकादेखील झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sherlyn chopra over casting couch in bollywood code word is dinner ssj

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या