scorecardresearch

श्रेयस तळपदे- मुक्ता बर्वेची केमिस्ट्री आली समोर…‘आपडी थापडी’चा टीझर प्रदर्शित

या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढलेली आहे.

श्रेयस तळपदे- मुक्ता बर्वेची केमिस्ट्री आली समोर…‘आपडी थापडी’चा टीझर प्रदर्शित

अभिनेता श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे हे लवकरच ‘आपडी थापडी’ या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. कारण पहिल्यांदाच श्रेयस आणि मुक्ता एकत्र काम करताना दिसणार आहेत. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढलेली आहे.

आणखी वाचा : “मोठं व्हायची इतकी घाई…” संकर्षण कऱ्हाडेचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अतिशय काटकसरी स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सखाराम पाटीलच्या कंजुषीची उदाहरणं चित्रपटाच्या टीजरमध्ये आपल्याला पाहता येतात. पण या बरोबरच या कथेला एक भावनिक किनार असल्यांचही टीजरमधून दिसतं.

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीता करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

आणखी वाचा : बॉयकॉट ट्रेंडबाबत ‘त्या’ वक्तव्यानंतर श्रेयस तळपदेचा आलियाला खास सल्ला, म्हणाला…

श्रेयसच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यावेळी पोस्ट शेअर करत लिहिलं होतं, “आजच्या दिवशी आपणा सर्वांसाठी एक खास भेट. माझ्याबरोबरच आपलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या या नवीन बाळालाही लाभो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना.” आता उत्सुकता आहे ती चित्रपटाच्या ट्रेलरची. पुढील महिन्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shreyas talpade mukta barve upcoming film aapdi thapdi teaser launched rnv