बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन नुकतीच तिचा कथित ब्रिटीश प्रियकर मायकल कोरासलसोबत पुन्हा एकदा दिसली. दोघांची गाडीमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. श्रुती जेव्हा विमानतळावरुन निघाली तेव्हा मायकलने तिला गाडीत मिठी मारली ज्याचे फोटो नितिश शेखर नावाच्या एका युझरने सोशल मीडियावर शेअर केले. मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मायकल खास श्रुतीला भेटण्यासाठी आणि तिला विमानतळावर पोहोचवण्यासाठी आला होता. मायकल हा लंडनमध्ये राहणारा एक अभिनेता आहे. दिग्दर्शक, अभिनेते कमल हसन यांची मुलगी श्रुतीला याआधीही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी मायकलसोबत पाहण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिन्यात फक्त १५ दिवस काम करतात शिवाजी साटम, पण त्यांचे मानधन वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

गेल्या नऊ महिन्यांपासून मायकल आणि श्रुती एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याबद्दल खुलून बोलण्यास स्पष्ट नकार दिला. तिला या बाबतीत विचारले असता ती म्हणाली की, मी अशा बातम्यांवर विश्वास ठेवत नाही आणि या बातम्यांवर काही टिपणीही देऊ इच्छित नाही. या सर्व अफवा आहेत असं म्हणत ती म्हणाली की, मी अशा अफवांकडे दुर्लक्ष करते कारण मला माझं खासगी आयुष्य सर्वांसमोर आणायला आवडत नाही.

श्रुती आणि मायकल यांची पहिली भेट लंडनमध्ये झालेली. त्यावेळी श्रुती एका ब्रिटीश रॉक बँडसोबत एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी लंडनला गेली होती. असं म्हटलं जातं की, दोघांनी पहिल्याच भेटीत एकमेकांचे मोबाइल नंबर घेतले होते. यानंतर त्यांच्या भेटी वाढतच गेल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shruti hasan spotted with rumored boyfriend michael corsale in landon see pictures
First published on: 28-07-2017 at 17:46 IST