‘शुद्ध देसी रोमान्स’च्या ट्रेलरचे अनावरण जयपूरच्या राज मंदिरात

यशराज फिल्मस् ने ‘शुध्द देसी रोमान्स’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यासाठी जयपूरच्या प्रसिध्द राज मंदिराची निवड केली आहे.

यशराज फिल्मसने ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यासाठी जयपूरच्या प्रसिद्ध राज मंदिराची निवड केली आहे. चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे सर्व कथानक जयपूरमध्ये घडत असल्याने या गुलाबी शहराच्या सर्वात जुन्या थिएटरमध्ये ट्रेलरचे अनावर करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी ११ जुलै रोजी दुपारी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. नुकतेच मकाऊवरून परतलेले सुशांत आणि परिणीती समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
मनिष शर्मा दिग्दर्शित शुद्ध देसी रोमान्स या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shuddh desi romance trailer to be launched in jaipurs raj mandir