सध्या अनेक कलाकार सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे दिसत आहे. हे कलाकार त्यांच्या चाहत्यांशी संवाददेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून साधत आहेत. अभिनेत्री आश्का गोरडिया आणि पती ब्रेंट गोबले गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांना योगाचे धडे इन्स्टा लाइव्हद्वारे देत आहेत. नुकताच झालेल्या एका सेशनमध्ये अश्काच्या चॅटवर एक मुलाने अश्लिल कमेंट केल्या आहेत. त्यानंतर अश्काच्या मैत्रीणी श्वेता साळवे, नारायणी शास्त्री, मेघना नायडू यांनी या विरोधात पाऊल उचलत #IgnoreNoMoreला सुरुवात केली आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अभिनेत्रींनी त्यांच्या फोटो आणि व्हिडीओवर करण्यात आलेल्या अश्लिल कमेंटचे स्क्रिनशॉर्ट शेअर केलेल आहेत. श्वेता साळवेने स्क्रिन शॉर्ट शेअर करत, ‘मी गेल्या काही दिवसांपासून अशा कमेंटकडे दुर्लक्ष करीत आहे, कमेंट बॉक्स बंद करत आहे, काहींना मी ब्लॉकही केले आहे. पण आम्हाला असे का करावे लागत आहे? माझ्या ओळखीमधील एकही महिला अशी नाही जिला लैंगिक अत्याचाराला समोरे जावे लागलेले नाही’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘पुरुषांना त्यांच्या अश्लिल कृतीसाठी कधी जबाबदार धरले जाणार? कारवाई करण्याइतके सुरक्षित स्त्रियांना केव्हा वाटेल? एखाद्या गोष्टीची वाट पाहण्यापेक्षा त्या विरोधात बोलण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहन देते. #IgnoreNoMore’ असे तिने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.

त्यानंतर श्वेताने तिच्या मैत्रीणीच्या इन्स्टा लाईव्हवर एका १६ वर्षांच्या मुलाने अश्लिल कमेंट केल्याचा स्क्रिन शॉर्ट शेअर केला. तसेच हा बाबात तक्रार करणार असल्याचे म्हणताच त्या मुलाने माफी मागितली असल्याचे म्हटले आहे.

त्यानंतर अभिनेत्री हिना खानने देखील #IgnoreNoMore म्हणत एक पोस्ट केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shveta salve shares screenshots of a 16 year old boy passing vulgar comments on her avb
First published on: 12-06-2020 at 16:03 IST