बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूला आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. मुंबई पोलीस, बिहार पोलीस अन् आता ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत चाहत्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांमागे भक्कमपणे उभं राहावं अशी विनंती सुशांतची बहिणी श्वेता सिंह कीर्ती हिने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वाधिक वाचकपसंती – सुशांत मृत्यू प्रकरण: अभिनेते शेखर सुमन यांनी केली रियाच्या अटकेची मागणी

“सुशांतसोबत नेमकं काय घडलं? हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन सीबीआय चौकशीची मागणी करुया. या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळायलाच हवी. कोणाचंही आयुष्य असं उद्धवस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही. मी सुशांतच्या चाहत्यांना विनंती करतेय तुम्ही आमच्या पाठिमागे असेच खंभीरपणे उभे राहा. तुमच्यामुळेच आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळतेय.” अशी विनंती सुशांतची बहिणी श्वेता सिंह कीर्ती हिने एका व्हिडीओद्वारे केली आहे. हा व्हिडीओ सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “हे तर धर्मांधतेचं लक्षण”; बंगळुरुमधील घटनेवर प्रकाश राज संतापले

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत. यात रियाने AU नामक व्यक्तीला सर्वाधिक वेळा फोन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी AU हे नाव समोर आल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र AU ही रियाच्या जवळची व्यक्ती असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रिया आणि AU मध्ये ६३ फोन कॉल्स झाले. AU ही रियाची फॅमेली फ्रेंड असून तिचं नाव अनन्या उधास आहे. परंतु, रिया आणि अनन्यामध्ये इतक्या वेळा फोन का झाले हे अद्याप स्पष्ट न झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, रियाचे फोन कॉल्स रेकॉर्ड तपासल्यावर तिने महेश भट्ट यांनीदेखील फोन केले होते. तसंच तिने वडिलांना सर्वाधिक फोन केल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta singh kirti ankita lokhande sushant singh rajput death case mppg
First published on: 13-08-2020 at 12:44 IST