अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने या प्रकरणातील मुख्य आरोपी रिचा चक्रवर्तीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. १३ जून रोजी रियाने सुशांतची भेट घेतली, होती असा खळबळजनक दावा तिने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – “जबरदस्तीने ड्रग्ज देऊन सुशांतची हत्या केली”; बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप

१४ जून रोजी सुशांतचा मृत्यू झाला. परंतु मृत्यूपुर्वी १३ तारखेला रियाने सुशांतची भेट घेतली होती असा दावा श्वेताने केला आहे. “ही खऱ्या अर्थाने एक गेमचेंजर ब्रेकिंग न्यूज आहे. एक साक्षिदार आहे ज्याने रियाला सुशांतची भेट घेताना पाहिलंय. १३ जून रोजी नेमकं असं काय घडलं होतं? ज्यामुळे १४ तारखेला माझ्या भावाचा मृत्यू झाला.” अशा आशयाचं ट्विट श्वेताने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – भूमी पेडणेकर म्हणते, “…तर हा अभिनेता असता ‘सेक्स उपचार तज्ज्ञ’

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली असून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta singh kirti sushant singh rajput case rhea chakraborty mppg
First published on: 01-10-2020 at 18:09 IST