Photos : ‘मसान’ फेम श्वेता त्रिपाठी अडकली विवाहबंधनात

मोजके नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत गोव्यात हा लग्नसोहळा पार पडला.

shweta tripathi and chaitanya sharma
श्वेता त्रिपाठी, चैतन्य शर्मा

‘मसान’ या चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आणि अभिनेता- रॅपर चैतन्य शर्मा विवाहबंधनात अडकले. मोजके नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत गोव्यात शुक्रवारी श्वेता- चैतन्यचा लग्नसोहळा पार पडला. चैतन्य श्वेतापेक्षा वयाने पाच वर्षांनी लहान आहे. सध्या सोशल मीडियावर या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.

पाच वर्षांपूर्वी श्वेता आणि चैतन्यच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. विमानप्रवासादरम्यान त्यांच्यात हे प्रेमाचं नातं खुललं होतं. खुद्द श्वेतानेच ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना याविषयीची माहिती दिली होती. रंगभूमीशी या दोघांचंही खास नातं आहे. चैतन्यने एका परफॉर्मिंग क्लबमध्येच श्वेताला लग्नासाठी विचारलं होतं. आपल्याकडे एक नवं नाटक असल्याचं सांगत त्याने श्वेताला क्लबमध्ये बोलावलं आणि प्रपोज करत तिला सुखद धक्काच दिला होता.

https://www.instagram.com/p/BknqLTVn3X0/

Sanju Box Office Collection Day 1: रणबीरच्या ‘संजू’ने सलमानलाही टाकलं मागे

चित्रपटसृष्टीत श्वेताने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यासोबतच ती वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. तर रॅपर चैतन्य शर्मा ‘स्लो चिता’ या नावाने प्रसिद्ध आहे. ‘हायजॅक’ या चित्रपटातील ‘कृपया ध्यान दे’ हे त्याचं गाणं गाजलं होतं. चैतन्यने ‘बॉयगिरी’ या वेब सीरिजमध्येही भूमिका साकारली होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shweta tripathi and chaitnya sharma tie the knot in goa wedding photos and videos