बॉलीवूडचे महान दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ चित्रपटाने मला दिग्दर्शक होण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे वक्तव्य दिग्दर्शक इम्तियाझ अलीने केले. १६ व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हल(मामि) दरम्यान तो बोलत होता.
श्याम बेनेगल यांचा ‘जुनून’ चित्रपट माझा सर्वात पसंतीचा चित्रपट असून एक उत्तम दिग्दर्शक होण्यासाठी या चित्रपटाची मला वेळोवेळी मदत झाली असल्याचे इम्तियाझ यावेळी म्हणाला. तसेच जुनून चित्रपटातील कलाकारांचे इम्तियाझने कौतुक केले. ‘जुनून’ हा चित्रपट १९७८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शशी कपूर, नसरुद्दीन शहा, शबाना आझमी यांच्या भूमिका होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shyam benegals junoon inspired me to be filmmaker imtiaz ali
First published on: 21-10-2014 at 06:43 IST