scorecardresearch

नाते संबंधावरील गणितावर भाष्य करणारा ”सिद्धांत”

नवलखा आर्ट्स आणि होली बेसिलच्या निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांच्यासोबत अमित अहिरराव यांनी ‘सिद्धांत’ या आगामी सिनेमाची निर्मिती केली असून ‘सिद्धांत’ सिनेमाची निवड मानाच्या समजल्या जाणाऱ्या १६व्या ‘मामी’ फिल्म फेस्टिवलच्या ‘इंडिया गोल्ड २०१४’ विभागात करण्यात आली आहे.

नवलखा आर्ट्स आणि होली बेसिलच्या निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांच्यासोबत अमित अहिरराव यांनी ‘सिद्धांत’ या आगामी सिनेमाची निर्मिती केली असून ‘सिद्धांत’ सिनेमाची निवड मानाच्या समजल्या जाणाऱ्या १६व्या ‘मामी’ फिल्म फेस्टिवलच्या ‘इंडिया गोल्ड २०१४’ विभागात करण्यात आली आहे. येत्या १४ ऑक्टोबरपासून  २१ ऑक्टोबर दरम्यान हा सोहळा रंगणार आहे.  
गणित हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाच्या पचनी पडत नाही. पण अभ्यासातील या गणिताचा आयुष्यातील नात्यांशी ही तेवढाच जवळचा संबंध आहे.  नाती जमतात म्हणून गणित सुटतात, का गणित सुटतात म्हणून नाती जमतात, त्यामुळेच गणित हा विषय जरी आवडत नसला तरी आयुष्यातील नाती टिकविण्यासाठी गणिता सारख्या पद्धातीशी  मैत्री करण्याशिवाय काही पर्याय नाही. एकंदरीतच नाते संबंधातील गणितावर भाष्य करणारा असा ‘सिद्धांत’ सिनेमा असून सिनेमाचे दिग्दर्शन विवेक वाघ यांनी केले आहे. सिने दिग्दर्शनातील त्यांचे हे पहिलेच पाऊल असून ‘शाळा’ सिनेमाची निर्मिती तसेच आजवर अनेक सिनेमांसाठी क्रिएटीव्ह हेड म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
‘सिद्धांत’ सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, गणेश यादव, किशोर कदम, स्वाती चिटणीस, नेहा महाजन, सारंग साठे, माधवी सोमण आणि बालकलाकार अर्चित देवाधर अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून यांचा उत्तम अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेखर ढवळीकर यांनी या सिनेमासाठी पटकथा- संवाद लिहिले असून सिनेमातील गाणी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी लिहिली आहेत. संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून नुकतेच सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमातील एक गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे.
नुकत्याच सोशल साईट्सवर पोस्ट करण्यात आलेल्या ‘सिद्धांत’ सिनेमाच्या पोस्टरने मनोरंजन क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली असून रसिक प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.    

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Siddhant upcoming marathi movie

ताज्या बातम्या