सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे ‘या’ वेब सीरिजमध्ये दिसणार एकत्र

या सीरिजमध्ये विराजस कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

siddharth chandekar and parna pethe, siddharth chandekar, parna pethe, adhantari, siddharth chandekar upcoming marathi web series,

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धर्थ आणि पर्ण पेठे हे ‘अंधातरी’ या आगामी शोमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या शोमध्ये लोकप्रिय विराजस कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

‘अधांतरी’ ही काहीशी मजेशीर प्रेमळ आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी रोमँटिक कॉमेडी ड्रामा कथा आहे. लाँग-डिस्टंस नात्यात असलेल्या जोडप्याला काही कारणांमुळे बराच काळ एकत्र रहावे लागते. ही कारणे त्यांच्या नियंत्रणाबाहेरील आहेत.

‘अंधातरी’ शोमधील आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “मागील वर्षभरात प्रत्येक जोडप्याला जो अनुभव आलाय असाच काळ यात आहे. त्यामुळे ही कथा फारच आपलीशी वाटते. शिवाय, पर्ण आणि माझी व्यक्तीरेखाही अगदी तुमच्या-आमच्यासारखी आहे. प्रत्येक जोडपं बांधिलकी, अनुरूपता आणि एकमेकांशी अधिक घट्ट बंध असावेत अशी अपेक्षा करतो. या शोमध्ये हे सगळे प्रश्न काहीशा नाट्यमय मात्र विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by parna (@parnapeace)

पर्ण पेठे शो विषयी म्हणाली, “परफेक्ट नसलेल्या लोकांच्या जगात एकदम परफेक्ट बसणारी कथा आहे अंधातरीची. मी मुग्धा या मुंबईतील एका मुलीची भूमिका साकारली आहे. ती लाँग डिस्टंस रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र, बॉयफ्रेंडसोबत खूप मोठा काळ घालवावा लागतो तेव्हा एकेक गोष्टी स्पष्ट होत जातात. हल्लीच्या आधुनिक जगात नातेसंबंध टिकवून ठेवणे लोकांसाठी फारच कठीण झाले आहे. अशा जगातील अनेक गोष्टींचं प्रतिबिंब यात दिसेल.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Siddharth chandekar and parna pethe upcoming marathi web series adhantari avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या