अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी निधन झाले आहे. तो ४० वर्षांचा होता. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याची माहिती कूपर रुग्णालयातून देण्यात आली आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहे. पण सोशल मीडियावर मात्र सिद्धार्थच्या संपत्तीविषयी चर्चा रंगल्या आहेत.

सिद्धार्थने मॉडेलिंग करत करिअरला सुरुवात केली होती. त्याने ‘बालिका वधू’ या मालिकेत काम करत अनेकांची मने जिंकली. त्याची शिव ही भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. या मालिकेनंतर त्याला अनेक मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या.

आणखी वाचा : सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकताच शेहनाज…

acknowledge डॉम कॉमने दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ कोट्यावधी रुपयांचा मालक होता. २०२० पर्यंत त्याच्याकडे १.५ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ११.२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे काही लग्झरी गाड्या देखील आहेत.

१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली. त्याने रिअॅलिटी शो बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.