गेल्या काही दिवसांपासून सुप्रसिद्ध दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला व त्याचं कुटुंब चर्चेत आहे. सिद्धू मुसेवालाची ५८ वर्षांची आई चरण कौर गर्भवती असल्याचं वृत्त आल्यापासून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. पण यासंबंधित अनेक अफवा पसरल्या होत्या. सिद्धू मुसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्यानंतर सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली. त्यांच्या या पोस्टमुळे संभ्रम निर्माण झाला. नक्की सिद्धूची आई गर्भवती आहे की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता बलकौर सिंह यांनी नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. अखेर मुसेवालाच्या घरी एका गोंडस मुलाचं आगमन झालं आहे.

बलकौर सिंह यांनी सोशल मीडियावर सिद्धूच्या धाकट्या भावाची पहिली झलक शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. सिद्धूची चरण कौर यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याचा फोटो शेअर करत सिद्धूच्या वडिलांनी लिहिलं आहे, “शुभदीपच्या (सिद्धू मुसेवाला) लाखो-कोट्यवधी चाहत्यांच्या आशीर्वादाने ईश्वराने आम्हाला सिद्धूचा छोटा भाऊ दिला आहे. ईश्वराच्या कृपेनं कुटुंब निरोगी आहे आणि सर्व चाहत्यांच्या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे.”

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न

हेही वाचा – “वंदे मातरम दुर्दैवाने राष्ट्रीय गीत झालं”, शरद पोंक्षेंचं वक्तव्य, काँग्रेसचा उल्लेख करत म्हणाले, “हिंदू-मुस्लिम…”

दरम्यान, सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांना कोणताही आधार नव्हता. म्हणून घराला वारस असण्यासाठी सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी हा निर्णय घेतला होता. आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर या गर्भवती राहिल्या होत्या. तेव्हापासून सिद्धूच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं. अखेर सिद्धूच्या घरी त्याच्या छोट्या भावाचं आगमन झालं आहे.

हेही वाचा – सिद्धू मुसेवाला मागे सोडून गेलाय कोट्यवधींची संपत्ती

२९ मे २०२२मध्ये पंजाबच्या मानस जिल्ह्यात सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती. यावेळी सिद्धू अवघ्या २८ वर्षांचा होता. त्याने आपल्या कामाने देशभरात नाही तर जगभरात नाव कमावलं होतं. तरुणाई तर त्यांच्या गाण्यांची अक्षरशः वेडी होती.