यंदाच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले या यंदा पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. त्याबरोबरच विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली. यानुसार यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. तर चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता प्रसाद ओकला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेत्री विद्या बालनचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
आणखी वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान

ashok saraf won master dinanath mangeshkar award
“एका असामान्य परिवाराकडून…”, पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले…
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
zee natya gaurav puraskar 2024
मोहन जोशींना यंदाचा ‘झी जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान! म्हणाले, “आताच्या नव्या पिढीने…”
singer kartiki gaikwad father pandit kalyanji gaikwad awarded shri sant eknath maharaj swar martand from govind giri maharaj
कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा मानाच्या पुरस्काराने गौरव, पोस्ट करत म्हणाली, “हा पुरस्कार म्हणजे साक्षात…”

मंगेशकर कुटुंब गेल्या ३३ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा येत्या २४ एप्रिल २०२३ रोजी पार पडणार आहे. मुंबईतील सायन याठिकाणी असणाऱ्या श्री षण्मुखानंद हॉल इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आणखी वाचा : ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी झाले भावूक, म्हणाले…

दरम्यान गेल्या वर्षीपासून, मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच व्यक्तीला दिला जातो. आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाणार आहे. गेल्यावर्षी या पुरस्काराचे मानकरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते. यावर्षी ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ लतादीदींच्या लहान बहिणीला अर्थात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना दिला जाणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

  • विशेष वैयक्तिक पुरस्कार- पंकज उदास (भारतीय संगीत),
  • सर्वोत्कृष्ट नाटक- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे ‘नियम व अटी लागू’
  • श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्ट- (समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा)
  • वागविलासिनी पुरस्कार – ग्रंथाली प्रकाशन – (साहित्य क्षेत्रात समर्पित सेवा)
  • विशेष पुरस्कार – श्री.प्रसाद ओक (चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवा)
  • विशेष पुरस्कार- विद्या बालन (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)