प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहपात्रानंतर आणि आणखी एका गायिकेने संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. शान, सुनिधी चौहान यांसारख्या प्रसिद्ध गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिक यांनी किस मागितल्याचा आरोप गायिका श्वेता पंडितने केला आहे. सोशल मीडियावर श्वेताने यासंदर्भातील पोस्ट लिहिली आहे. त्याचसोबत नवोदित गायिकांना अनू मलिकपासून सावध राहण्याचा इशाराही श्वेताने या पोस्टद्वारे दिला आहे.

‘२००० साली मोहब्बते या चित्रपटात मला गाण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी माझं खूप कौतुक झालं होतं. मला गाण्यातच पुढे करिअर करायचं होतं. २००१ मध्ये अनू मलिक यांचे व्यवस्थापक मुस्तफा यांचा मला फोन आला आणि त्यांनी एम्पायर स्टुडिओत बोलावलं. मी खूपच उत्सुक होते. अनू मलिक यांनी मला गाण्यास सांगितलं आणि माझ्या गायनावर ते खूप खूश झाले. ते म्हणाले मी तुला शान आणि सुनिधीसोबत गाण्याची संधी देईन, पण मला आधी एक किस दे. मी खूप घाबरले. तेव्हा मी जेमतेम १५ वर्षांची होती. ते माझ्या कुटुंबीयांना ओळखायचे. मी त्यांना अनू अंकल म्हणायची. त्यांना दोन मुली असताना एका अल्पवयीन मुलीशी ते असं कसं वागू शकतात हा प्रश्न मला भेडसावत होता. त्या घटनेचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की मी इंडस्ट्री सोडण्याच्या विचारात होते,’ असं श्वेताने लिहिलं.

https://twitter.com/ShwetaPandit7/status/1052490035407204353

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : मी मुलींना फसवलं, अत्यंत वाईट वागणूक दिली होती- साजिद खान

ज्या तरुणी अनू मलिक यांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत, त्यांनी समोर येऊन आवाज उठवण्याचं आवाहन श्वेताने ट्विटरवर केलं आहे. त्यासोबतच तिने गायिका सोना मोहपात्राचे आभार मानले.