पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पिंपरी शाखेच्या वतीने देण्यात येणारा आशा भोसले पुरस्कार यंदा प्रसिद्ध गायक पद्मभूषण उदित नारायण यांना जाहीर झाला आहे. शनिवारी (४ ऑगस्ट) नवी सांगवी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाटय़ परिषदेचे शहराध्यक्ष व नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी ही माहिती दिली. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता सांगवीतील निळूभाऊ फुले नाटय़गृहात हा समारंभ होणार आहे. या वेळी पं. हृदयनाथ मंगेशकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने आदी उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे यंदा १६ वे वर्ष आहे. एक लाख ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उदित नारायण यांनी ३२ भाषांमध्ये मिळून १८ हजारांपर्यंत गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांच्या समवेत २०० आणि आशाताईंबरोबर सुमारे ४०० गाणी गायली आहेत. पं. मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने उदित नारायण यांची पुरस्कारासाठी निवड केली, असे भोईर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer udit narayan get asha bhosle awards
First published on: 31-07-2018 at 02:21 IST