क्रिकेटच्या मैदानावर धावांच्या विक्रमांचा डोंगर रचणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता एका नव्या रुपात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटातून सर्वांच्या लाडक्या सचिनची कारकीर्द आणि त्याचा आतापर्यंतचा प्रवास उलगडला जाणार आहे. हा चित्रपट संपूर्णपणे व्यावसायिक धाटणीचा चित्रपट नसून, तो एका माहितीपटाच्या रुपात सादर केला जाणार आहे. सचिनच्या जीवनातील प्रसंग या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जागे केले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच आता मास्टर ब्लास्टरच्या या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याआधी एका खास कार्यक्रमामध्ये चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. आता सचिनचा चित्रपट म्हटल्यावर स्क्रीनिंगचं निमंत्रणही खास असणार यात वादच नाही. सचिनने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या निमंत्रणाचे फोटो शेअर केले आहेत. ‘रविश कपूर इन्व्हिटेशन्स’तर्फे ही निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली असून, क्रिकेट आणि सचिन हे या निमंत्रण पत्रिकेचे मुख्य घटक असल्याचं लक्षात येतंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sneak peek into sachin tendulkars invite for sachin a billion dreams premier going viral see photo
First published on: 24-05-2017 at 10:25 IST