छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. ती सध्या बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. एका जुन्या मुलाखतीमध्ये स्नेहाने तिच्या दोन्ही लग्नांविषयी वक्तव्य केले होते. तिची ती जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेत आहे. आता ती मुलाखत पाहून स्नेहाच्या दुसऱ्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे.

स्नेहाने वयाच्या १९व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१५मध्ये स्नेहाने अनुराग सोलंकीशी दुसऱ्यांदा लग्न केले. लग्नाच्या आठ महिन्यांनंतर अनुराग आणि स्नेहानाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१८मध्ये स्नेहाने एका मुलाखतीमध्ये बोलत असताना तिच्या दोन्ही अपयशी ठरलेल्या लग्नांचा खुलासा करत त्यामागचे कारणदेखील सांगितले होते.

आणखी वाचा : १९व्या वर्षी पहिलं लग्न तर आठ महिन्यात दुसऱ्यापतीसोबत काडीमोड; जाणून घ्या कोण आहे स्नेहा वाघ

‘तो चुकीचा माणूस होता असे मी म्हणणार नाही, पण हो, तो माझ्यासाठी योग्य नव्हता. दोन अपयशी विवाहांनंतर, मला समजले की पुरुषांना जिद्दी महिला आवडत नाहीत. माझा स्वभाव खूप मृदू आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळेही मी घाबरते. आता मी ठामपणे सांगू शकते की लग्न ही संकल्पना माझ्यासाठी नाही. आपल्या समाजात फक्त पुरुषच कुटुंबीयांची काळजी घेऊ शकतात असा समज आहे. पण हे सत्य नाही. मला स्वत:वर विश्वास आहे आणि मी माझ्या कुटुंबीयांची काळजी घेऊ शकते’ असे स्नेहा म्हणाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता स्नेहा बिग बॉसच्या घरात गेल्यावर तिची ही जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. तिच्या दुसऱ्या पतीने तिचा झळ केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते पाहून अनुराग सोलंकीने ट्वीट केले आहे. ‘गेमसाठी लोकं कोणत्याही थराला जातात हे पाहून मला धक्काच बसला. मला यावर काहीच बोलायचे नाही पण स्नेहा एक विनंती आहे की जेव्हा तू बिग बॉसच्या घरातून बाहेर येशील तेव्हा मी तुझा झळ केला याचे काही पुरावे असतील तर ते जगाला दाखव’ या आशयाचे ट्वीट अनुरागने केले आहे.