बिकिनीवर दृश्य देण्यास आजवर आढेवेढे घेणारी सोहा अली खान अखेर बिकीनीवर कॅमेऱ्यासमोर येण्यास तयार झाली आहे. वास्तविक तिची आई शर्मिला टागोरनेसुद्धा ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’मध्ये बिकिनीमध्ये कॅमेऱ्यासमोर येण्याचे धाडस दाखविले होते. परंतु, सोहा मात्र ‘गरज नसताना उगीचच बिकिनी दृश्य देणे पटत नाही’ असे म्हणत बिकिनी घालण्यास नाही नाही करीत होती. मात्र ‘जो बी काव्‍‌र्हालो’ या सिनेमात आपण बिकिनी घालणार असल्याचे तिनेच जाहीर केलेय. टू पीस बिकिनीमध्ये तिच्यावर प्रसंग चित्रित झाला आहे. तरणतलावामधील एक दृश्य मी आणि अर्शद वार्सी यांच्यावर चित्रित झाले असून त्यामध्ये आपण बिकिनीमध्ये आहोत. हा विनोदी प्रसंग आहे. या दृश्याबद्दल आईला सांगितलेस का, असे विचारले असता सोहा म्हणाली की, तिला अजून माहीत नाही.  बिकिनी दृश्य चित्रित करण्यास आजवर माझा विरोध होता. कारण तसे दृश्य देण्याची गरज आजवर भासली नाही. या चित्रपटात तरणतलावातील दृश्य असल्यामुळेच बिकिनी दृश्य दिल्याचे स्पष्टीकरण सोहा देते. मॅक्झिम या नियतकालिकासाठी छायाचित्र दिले तेव्हा ती गरज होती. तो फोटो ‘व्हल्गर’ नव्हता. म्हणूनच मी ते मुखपृष्ठ छायाचित्र दिले. बिकिनी दृश्य देताना मला स्वत:ला त्यात ‘कम्फर्टेबल’ वाटणे महत्त्वाचे आहे. ‘मिस्टर जो बी काव्‍‌र्हालो’ या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका सोहा साकारत आहे. विशेष म्हणजे एक पोलीस अधिकारी, एका दृश्यात बिकीनी, एका दृश्यात कॅब्रे डान्सर, एका दृश्यात अप्सरा अशा वेगवेगळ्या दृश्यांमध्ये वेगवेगळ्या पोषाखात सोहा दिसणार आहे. त्याशिवाय युद्धावरील ‘वॉर छोड दो ना यार’, ‘चारफुटियाँ छोकरे’ या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.