नव्वदच्या दशकात प्रसारित केल्या जाणाऱ्या मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. आजच्या विविध धाटणीच्या आणि मोठाले सेट असणाऱ्या मालिकांच्या गर्दीत नव्वच्या दशकातील मालिकांचं स्थान आजही अबाधित आहे. अशीच एक मालिका म्हणजे ‘ज्युनियर जी’. सुपरहिरोची संकल्पना हाताशी घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्या काळी गाजलेल्या काही मालिकांमध्ये ‘ज्युनियर जी’ आघाडीवर होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यातही ‘ज्युनियर जी’चं पात्र साकारणाऱ्या बालकलाकाराने अनेकांची मनं जिंकली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय टेलिव्हिजन विश्वात सुपरहिरोची संकल्पना मांडणाऱ्या त्या बालकलाकाराचं नाव होतं, अमितेश कोचर. ‘ज्युनियर जी’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अमितेश यशाच्या परमोच्च शिखरावर जाऊन पोहोचला. त्यावेळी मुकेश खन्ना यांचा ‘शक्तिमान’ हा कार्यक्रमही प्रेक्षकामध्ये बराच प्रसिद्ध होता. त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी कमालीची स्पर्धा पाहायला मिळाली होती. प्रेक्षकांची दाद, प्रसिद्धी मिळवणाऱ्या या मालिकेमुळे अमितेश कोचर हे नाव घराघरात पोहोचलं. पण, कार्यक्रमानंतर मात्र अमितेश अचानक या क्षेत्रातून नाहीसा झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि काही संकेतस्थळांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमितेशने ‘ज्युनियर जी’नंतर कोणत्याच दुसऱ्या कार्यक्रमात काम केलं नाही. तो कोणत्याही कार्यक्रमातही दिसला नाही. सोशल मीडियावरही त्याची फारशी माहिती उपलब्ध नाहीये.

Hardik Pandya : अंतिम सामन्यातील हार्दिकच्या परफॉर्मन्समुळे लिशा शर्मा आली चर्चेत, पाहा कोण आहे ‘ती’?

अमितेशच्या नावे एक ट्विटर अकाऊंट आहे खरं. पण, त्या अकाऊंटवरही तो फारसा सक्रिय नाही. अमितेशने साकारलेल्या या पात्राची प्रेक्षकांवर अशी काही जादू होती की, सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या या नावाचे हँडल्सही ठेवले आहेत. आजही अनेकजण या अभिनेत्याचा शोध घेत आहेत.

वाचा : रोल मिळवण्यासाठी अनुपम खेर यांनी कोणाला केले १२ फोन

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some interesting facts about television serial junior g superhero fame actor amitesh kochar
First published on: 22-06-2017 at 01:38 IST