ई- कॉमर्स साईवरुन खरेदी करताना अनेक ग्राहकांची फसवणूक होते. गेल्या कित्येक वर्षांत अशा साइटवरून खरेदी करताना ग्राहकांना मोठा फटका बसल्याचं दिसून आलं आहे. महागड्या वस्तूंच्या बदल्यात बॉक्समध्ये साबणाची वडी, दगड अशा वस्तू येण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सर्वसामान्य माणसांना अशा मोठमोठ्या साइटवरुन खरेदी करण्याचे वाईट अनुभव आल्याच्या कित्येक बातम्या आपण वाचल्याही असतील. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिलादेखील असाच वाईट अनुभव आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनाक्षीनं अॅमेझॉन या लोकप्रिय इ कॉमर्स साइवरुन एका महागड्या ब्रँडचे हेडफोन्स मागवले. ऑर्डर मिळाल्यानंतर सोनक्षीनं जेव्हा बॉक्स उघडून पाहिला तेव्हा त्यात हेडफोन्सच्या बदल्यात लोखंडी नळाचा तुकडा होता. सोनालीनं ट्विट करत याबद्दल अॅमेझॉनकडे तक्रार केली आहे. तसेच अॅमेझॉनच्या ग्राहक सेवेवरही तिनं नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही असंही सोनाक्षीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हेडफोन्सचा बॉक्स अगदी व्यवस्थितरित्या पॅक करून आला होता, मात्र त्यात हेडफोन्सएवजी पाइपचा तुकडा असं म्हणतं तिनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha gets iron piece instead of headphones on amazon
First published on: 12-12-2018 at 19:39 IST