महाराष्ट्रात हास्याला मिळाले हमखास आरक्षण, कारण महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी शो ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ प्रेक्षकांना एका नव्या ढंगात सहा महिन्यांआधी भेटायला आला. या कार्यक्रमातील कल्लाकार प्रेक्षकांना त्यांच्या अतरंगी, खुसखुशीत विनोदशैलीने पोट धरून हसवत आहेत. हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच ठरतोय. कार्यक्रमातील अनेक बदलांबरोबर यामधील परीक्षक देखील बदलले ज्यांनी काही महिन्यांमध्येच प्रेक्षकांची मने जिंकली. याच कार्यक्रमातील महाराष्ट्राची लाडकी, देखणी आणि आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहा महिन्यांमध्ये या परिवाराचा एक महत्वपूर्ण भाग बनली आहे. याच आपल्या लाडक्या हास्यपरीला म्हणजेच सोनाली कुलकर्णीला ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ मधील कल्लाकारांनी एक छानसं सरप्राईझ दिलं. ज्यामुळे सोनालीला खूपच आनंद झाला. सोनालीचा वाढदिवस १८ मेला असतो. पण, त्याआधीच ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ च्या संपूर्ण टीमने तिला सरप्राईझ दिलं. सेटवर तिच्यासाठी केक मागविण्यात आला होता, स्टेज फुग्यांनी सजवला होता. तिचा वाढदिवस नक्कीच या टीमने खूप खास बनविला यात शंका नाही.

sonalee-kulkarni-02

यावर बोलताना सोनाली म्हणाली, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमाचा मी आता सहा महिन्यांपासून भाग आहे जणू हा माझा परिवारच आहे असं मला वाटतं. माझ्यासाठी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ च्या सेटवर येणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते. जसा प्रत्येकासाठी रविवार असतो तसंच काहीस माझ्यासाठी इथे या मंचावर येण असतं. माझा वाढदिवस इतक्या सुंदर प्रकारे माझ्या या सगळ्या मंडळीनी साजरा केला हे माझ्यासाठी खूप मोठ सरप्राईज होत. या मंचावर येऊन मला सकारात्मक दृष्टीकोन मिळाला म्हणजेच छोट्या – छोट्या अडचणींमधून देखील आनंद कसा शोधावा हे कळलं. तसेच विनोदाचे कौतुक करण्याची माझी कुवत वाढली असे मी म्हणेन”. माझ्या वाढदिवसानिमित्त मला तर सरप्राईझ मिळालेच पण आता प्रेक्षकांनादेखील लवकरच एक सरप्राईझ मिळणार आहे”.

sonalee-kulkarni-03

आपल्या वाढदिवसानिमित्त सोनाली संपूर्ण ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ च्या टीमला पुण्यामध्ये पार्टी देणार आहे.