बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गेल्या काही दिवसापासून न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. सोनालीला हायग्रेड कॅन्सर झाला असून तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती चाहत्यांना दिली होती. सोनालीवर उपचार सुरु असतानादेखील ती सोशल मीडियाच्या सक्रिय असते. अनेक वेळा ती भावनिक पोस्ट करत असते. आज सोनालीच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे तिने पुन्हा एक भावनिक पोस्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनालीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून हा फोटो तिच्या लग्नातील असल्याचं दिसून येत आहे. सोनालीने २००२ साली गोल्डी बहलसोबत लग्नाची गाठ बांधली. तेव्हापासून आजपर्यंत गोल्डी प्रत्येक पावलावर सोनालीची साथ देताना दिसून येत आहे. याकारणामुळेच सोनालीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये गोल्डीचे आभार मानत तो तिच्यासाठी सगळं काही असल्याचं म्हटलं आहे.

‘गेल्या काही महिन्यांपासून मी कॅन्सर सारख्या आजाराचा सामना करत आहेत. पण या काळात गोल्डी कायम माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे कॅन्सरविरुद्ध मी लढत असलेली या लढाईत माझं कुटुंबसुद्धा माझ्यासोबत आहे. आज गोल्डी माझ्याबरोबर ठामपणे उभा आहे. त्यामुळेच मला या आजाराशी सामना करणं शक्य होत आहे, असं सोनाली म्हणाली’.

पुढे ती असंही म्हणाली, ‘गोल्डी माझ्यासाठी सगळं काही आहे. माझा नवरा,सखा, सोबती, जिवलग मित्र, माझा रॉक..सारं म्हणजे सारं काही. त्याच्याविषयी खूप काही मनात दाटलं आहे. पण हे सारं शब्दांत मांडणं शक्य नाही. माझा आधार झाल्याबद्दल गोल्डी तूझे मनापासून आभार’. दरम्यान, गोल्डी एक निर्माता असून त्याने ‘अंगारे’, ‘द्रोणा’ सारखे चित्रपट त्याने प्रोड्यूस केले आहेत. टीव्हीवरच्या अनेक मालिकांची निर्मितीही त्याने केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonali bendre gets emotional wedding anniversary goldie cancer treatment
First published on: 13-11-2018 at 15:52 IST