अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरवरील उपचारासाठी सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. हाय ग्रेड कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती सोनालीने स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. त्याचप्रमाणे कॅन्सरशी झुंज देण्यास सज्ज असल्याचंही तिने ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिलं होतं. कलाकार आणि चाहत्यांकडून तिला आधार मिळतच आहे. नुकतंच सोनालीने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने भावनिक आणि तितकाच प्रेरणादायी मेसेजसुद्धा लिहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक व्हिडिओसुद्धा सोनालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती एका नवीन लूकमध्ये पाहायला मिळत आहे. तिचा हा मेकओव्हर तुम्हालाही नक्की आवडेल.

सोनालीने लिहिलेली पोस्ट-

‘माझी आवडती लेखिका इसाबेल अलेंदेच्या Isabel Allende शब्दांत… आपल्यातील छुपी शक्ती दाखवण्यासाठी जोपर्यंत भाग पाडलं जात नाही, तोपर्यंत आपण किती शक्तिवान आहोत हे कळतच नाही. दु:खद क्षणांमध्ये, युद्धाच्या काळात किंवा अत्यंत निकडीच्या वेळी लोकांकडून चमत्कारिक गोष्टी घडतात. माणसाची जगण्याची आणि काहीतरी नवीन करण्याची क्षमता अद्भुत आहे.’

‘गेल्या काही दिवसांपासून लोकांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून मी गहिवरले आहे. ज्यांनी स्वत:चे किंवा आप्तेष्टांचे कॅन्सरशी लढा देतानाचे विविध अनुभव माझ्यासोबत शेअर केले त्यांची मी फार आभारी आहे. यामुळे मला प्रेरणा आणि शक्ती मिळत आहे. त्याहूनही अधिक मी या लढ्यात एकटी नाही याची जाणीव मला झाली आहे.’

‘प्रत्येक दिवशी एक नवीन आव्हान आणि नवीन विजयाला मी सामोरी जात आहे. या प्रवासात माझा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणं हासुद्धा त्याचाच एक भाग आहे. आपण सर्व काही गमावलं नसून कुठेतरी, काहीतरी असं आहे जे तुमची साथ देत आहे, हेच मला जाणवत आहे.’

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonali bendre on dealing with cancer says each day comes with its own challenges and victories
First published on: 10-07-2018 at 14:46 IST