हाय ग्रेड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सोनाली बेंद्रेवर सध्या न्युयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. सोनालीने तिच्या कॅन्सरची माहिती दिल्यानंतर ही गोष्ट वाऱ्यासारखी सर्वत्र पसरत आहे. त्यामुळेत सर्वच स्तरामधून सोनालीला आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही बॉलिवूड सेलेब्सने ट्विटरच्या माध्यमातून तर काही सेलेब्सने प्रत्यक्ष भेट देऊन तिला आधार दिला आहे. विशेष म्हणजे सोनालीकडे पाहून ती खंबीरपणे कॅन्सरशी लढा देत असल्याचं दिसून येत आहे. मात्र अभिनेत्री दिव्या दत्ताच्या एका पोस्टमुळे सोनालीच्या भावनांचा बांध फुटला आणि तिला रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं.

काही दिवसापूर्वीच अभिनेता अक्षयकुमारने न्युयॉर्कला जाऊन सोनालीची भेट घेतली. तर यापूर्वी कॅन्सरशी लढा दिलेल्या मनिषा कोइरालानेही सोनालीसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. मनिषा आणि अक्षयच्या यांच्या आधारामुळे सोनाली आधीच भावूक झाली होती. त्यामुळे दिव्याने तिच्यासाठी लिहीलेल्या पोस्टमुळे सोनालीला न राहावून रडू कोसळले.

सोनालीच्या कॅन्सरची बातमी समजताच दिव्याला प्रचंड धक्का बसला होता. त्यामुळे दिव्याने सोनालीसाठी एक भावूक ट्विट केलं. ‘चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं त्यावेळी माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. तेव्हा सोनालीच माझी पहिली मैत्रीण झाली होती’, अशा आशयाचं ट्विट दिव्याने केलं. जे वाचून सोनालीच्या डोळ्यात पाणी तरळलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर उत्तर देत सोनालीनेही ‘दिव्या तुझं हे ट्विट वाचून आज खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं. धन्यवाद’ असं सोनालीने उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, मनिषा कोइरालानेही सोनालीला ट्विट करत लवकर बरं होण्यास सांगितलं आहे. तसंच सोनाली स्ट्रॉंग आहे त्यामुळे ती या संघर्षात नक्कीच जिंकेल असा विश्वास अक्षयकुमारने दर्शविला आहे.