राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील ‘धीरे धीरेसे मेरे जिंदगी मे आना’ हे गाणे आजही अनेकजण गुणगुणतात. रॅपर हनी सिंगने याच गाण्याचे रिमेक केले आहे.
‘आशिकी’ चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने हे गाणे तयार करण्यात आले असून हृतिक आणि सोनमने त्याद्वारे गुलशन कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. या दोघांनाही ‘धीरे-धीरे’चे नवीन व्हर्जन टि्वट केले आहे.
watch #DheereDheere now on hotstar http://t.co/TQucjuYrqK
— Hrithik Roshan (@iHrithik) August 31, 2015
The wait is finally over. Check out #DheereDheere now on hotstar http://t.co/ge5yKqDqHU http://t.co/z88TE9qjUm pic.twitter.com/TSK6NqnnZB
— Sonam Kapoor (@sonamakapoor) August 31, 2015
रॅपसाठी प्रसिद्ध असलेल्या हनी सिंगचा मात्र, या गाण्यात एक वेगळा अंदाज ऐकावयास मिळतो. व्हिडिओमध्ये हृतिक-सोनमची जोडी सुंदर दिसत आहे. यात हृतिकने दिमाखदार अशा व्यावसायिकाची तर सोनमने पार्टी प्लॅनरची भूमिका साकारलीयं.