नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका दमदारपणे साकारणारा अभिनेता सोनू सूद आज ज्या ठिकाणी आहे त्यात त्याची बहिण मालविका हिचा मोठा वाटा आहे. यामुळेच सोनूने त्याच्या बहिणीला एक खास भेट दिली आहे. पंजाबमधील मोगा इथं तिच्या स्वप्नातलं घर सोनूने दिलं आहे. खरंतर पंजाबमधील हे घर मालविकाचंच आहे. मात्र सोनूने या घराचं रुप पालटून तिला एका नव्या रुपात भेट म्हणून दिलं आहे. गोदरेज इंटेरिओने सोनू सूदच्या बहिणीच्या या घराचा मेकओव्हर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनूच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच यशराज फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप घोषित झाले नाही. सोनूच्या करिअरची २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. तामिळ चित्रपटातून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं होतं.

पाहा फोटो : मराठीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या प्रवीण तरडेंच्या पत्नीचे सुंदर फोटो

इंडस्ट्रीत काम करण्याविषयी तो म्हणतो, “अभिनेता म्हणून मला अजून खूप काही शिकायचं आहे. सिनेक्षेत्रात करिअर करायचं अनेकांचं स्वप्न असतं. पण प्रत्येकालाच ती संधी मिळते असं नाही. मला ती संधी मिळाली म्हणून मी खूप खूश आहे. म्हणूनच जेव्हा नवोदित कलाकार मला भेटतात तेव्हा त्यांना मी एकच सांगतो, की खूप मेहनत करा आणि संयम ठेवा. तुम्हाला यश नक्की मिळेल.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu sood gifts his newly redone house in punjab to sister malvika ssv
First published on: 18-02-2020 at 17:30 IST