करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची. त्याने देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थांना ट्रेन व बसच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवले. त्याच्या या मदतीची सर्वत्र स्तुती होत आहे. मात्र तो एवढ्यावरच थांबलेला नाही. आता त्याने आपलं लक्ष विदेशात अडकलेल्या भारतीयांकडे वळवलं आहे. अलिकडेच त्याने किर्गिस्तान आणि जॉर्जियामध्ये अडकलेल्या विद्यार्थांना भारतात आणलं होतं. यानंतर आता त्याने फिलीपीन्समध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – WWE मध्ये नोकर कपात; या सुपरस्टार्सला दाखवला बाहेरचा रस्ता

Justice For Sushant: अमेरिकेतील चाहत्यांचा सुशांतच्या कुटुंबीयांना पाठिंबा

“तुम्ही भारतात परत आल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. फिलीपीन्स मिशनची पहिली फेरी पूर्ण झाली आता दुसऱ्या फेरीची तयारी करुया. जय हिंद” अशा आशयाचं ट्विट करुन सोनूने आपल्या या नव्या कामगीरीबद्दल सांगितलं. या मदतीसाठी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हे मिशन पूर्ण झाल्यानंतर तो मॉस्को आणि उज्बेकिस्तानमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना भारतात परत घेऊन येणार आहे.

सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu sood mission philipines successful coronavirus pandemic mppg
First published on: 09-08-2020 at 14:56 IST