सध्या छोट्या पडद्यावर विशेष गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे ‘सिंगिंग स्टार’. २१ ऑगस्टपासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. या शोच्या निमित्ताने कलाकारांची नवीन बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यातच येत्या आठवड्यात या शोमध्ये फर्माइश विशेष भाग रंगणार आहे. त्यामुळे या स्पर्धकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांकडून गाण्यांच्या फर्माइशी आल्या असून स्पर्धक ती  गाणी या विशेष भागात सादर करणार आहेत.

‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमात आरती वडगबाळकर, आस्ताद काळे, अभिजीत केळकर, अजय पुरकर, अंशुमन विचारे, अर्चना निपाणकर, गिरिजा ओक, पूर्णिमा डे, संकर्षण कऱ्हाडे, स्वानंदी टिकेकर, यशोमन आपटे हे स्पर्धक कलाकार सहभागी झाले असून ते फर्माइश केलेली गाणी सादर करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे अनेक दिग्गज कलाकारांनी या स्पर्धकांकडे गाण्यांची फर्माइश केली आहे.

Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी

दरम्यान, फर्माइश विशेष भागात  सुबोध भावे, शुभांगी गोखले, मकरंद अनासपुरे, मुक्ता बर्वे, अभिज्ञा भावे, सई ताम्हणकर, सुमित राघवन, कविता लाड-मेढेकर, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे आणि सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी आपल्या स्पर्धक-मित्रांसाठी गाण्याच्या खास फर्माइशी पाठवल्या आहेत.  त्यानुसार ही स्पर्धकमंडळी त्यांची गाणी सादर करणार आहेत. हा विशेष भाग ४ आणि ५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.