आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडण्यात आले. मात्र पहिल्यांदाच ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ यांचा प्रवास उलगडण्यात येत आहे. सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, सल्लामसलत, न्याय निवाड्यात जाणारा दिवस तर कधी युद्ध कलांचं प्रशिक्षण घेण्यात त्याचं बालपण गेलं. मात्र आता त्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या दिशेने वळाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पारतंत्र्यात असलेल्या रयतेची वेदना जिजांनी लहानपणीच पाहिल्या आहेत. त्यामुळे मनोमनी या एकंदर परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. थोड्या फार फरकाने एकाच विचाराच्या असणाऱ्या जिजा आणि शहाजींचं लग्न झालं आणि जिजांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. त्यांचं कर्तब थोर होतंच त्यात आपलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या कटीबध्द ही होत्या. त्यासाठीच शिवबांना युध्दकलेत पारंगत करणं असो किंवा स्त्रियांचा सन्मान करणे हे सारे संस्कार त्यांनी शिवबांवर केले. तसंच जाती – धर्मांमध्ये फरक न करता सगळ्यांना समान वागणूक देण्याचे संस्कार ही शिवबांवर त्यांनी केले. शहाजी राजांच्या गैरहजेरीत मातृत्त्वाची जबाबदारी पार पाडतानाच जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम ही त्यांनी चोखपणे पार पाडलं. हे सारे प्रसंग स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून उलगडण्यात आले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sony marathi swarajya janani jijamata new serial ssj
First published on: 18-11-2019 at 19:18 IST