जाणून घ्या, रजनीकांत यांच्या पक्षाचे चिन्ह समजल्या जाणाऱ्या ‘या’ चिन्हाचे विविध अर्थ
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुपरस्टार आणि थलैवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशासोबतच त्यांच्या पक्षाच्या चिन्हाविषयी अनेक चर्चा पाहायला मिळाल्या. योगाभ्यासात आणि अध्यात्मात फार महत्त्व असणाऱ्या या मुद्रेचा उल्लेख ‘अपान मुद्रा’ असाही करण्यात येतो. ‘वायू मुद्रा’ आणि ‘पृथ्वी मुद्रा’ या दोन मुद्रा एकत्रित आल्यानंतर ‘अपना मुद्रा’ साकारली जाते. शारीरिक स्वास्थ्य आणि आंतरिक शक्ती हे अपान मुद्रेशी संबंधित आहे.
निरुपयोगी गोष्टी शरीराबाहेर टाकून एक नवी उर्जा उत्पन्न करण्यासाठी सुद्धा या मुद्रेची मदत होते, असे म्हटले जाते. ही मुद्रा दिसण्यास अगदी सोपी असली तरीही तज्ज्ञांच्या मदतीनेच तिचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. रजनीकांत यांच्या आयुष्यात असणारं अध्यात्माचं महत्त्व लक्षात घेता या मुद्रेचीच निवड पक्षाचे चिन्ह म्हणून केले जाणार अशी अनेकांना खात्री आहे.

वाचा : ‘टायगर जिंदा है’चा असाही एक विक्रम, आमिरच्या ‘३ इडियट्स’ला टाकले मागे

सिंहमुख मुद्रा
फक्त अध्यात्मातच नव्हे, तर शास्त्रीय नृत्यकलेतही या मुद्रेला फार महत्त्व आहे. ‘सिंहमुख मुद्रा’ म्हणून ही मुद्रा नृत्यकलेत ओळखली जाते. भरतनाट्यम, कुचिपुडी आणि ओडिसी नृत्यांमध्ये या मुद्रेचा वापर केला जातो. आपला स्वाभिमान आणि समाजातील स्थान कायम ठेवण्यासाठी नेहमीच धैर्याने कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाणाऱ्या सिंहाला या मुद्रेतून साकारण्यात येतं.

कर्ण मुद्रा
कर्ण मुद्रेशी बुद्ध धर्माचेही नाते जोडले जाते. भगवान गौतम बुद्धांच्या काही पुरातन चित्रांमध्येही ही मुद्रा आढळते. असंतुष्ट आणि नकारात्मक ऊर्जेचा नायनाट करण्याच्या दृष्टीने ही मुद्रा अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले जाते.

विविध अर्थ असणाऱ्या या मुद्रेचे तरुणाईतही वेगळेच वेड पाहायला मिळते. या मुद्रेचे सर्वच दृष्टीने असलेलं महत्त्व आणि त्यात दडलेला अर्थ या सर्व गोष्टी नजरेत घेऊनच सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या पक्षाचे चिन्ह म्हणून याच मुद्रेची नवड करतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येतेय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.