‘सुपरस्टार’ आणि ‘थलैवा’ या दोन विशेषणांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता रजनीकांत यांचा आणखी एक अफलातून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. २७ एप्रिलला रजनीकांत यांची मुख्य भूमिका असणारा ‘काला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर करत धनुषने ट्विटरवर एक फोटोही पोस्ट केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनुषने ट्विट केलेल्या या फोटोमध्ये रजनीकांत एका खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. काळ्या रंगाची लुंगी आणि काळा शर्ट अशी एकंदर वेशभूषा त्यांच्या लूकला आणखीनच उठावदार करत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी धनुषने त्याच्या खांद्यावर घेतली आहे. रंजित (Pa. Ranjith) दिग्दर्शित या चित्रपटातून रजनीकांत पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
रजनीकांत यांच्या राजकीय कारकिर्दीला सध्या सुरुवात झाल्यामुळे काला हा चित्रपट सर्वतोपरी आकर्षणाचा विषय ठरत आहे. त्यामुळे गँगस्टरच्या भूमिकेतून विविध विक्रम रचणाऱ्या ‘कबाली’ या चित्रपटानंतर अभिनेता रजनीकांत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

वाचा : ‘रजनीच्या राजकारणावर केशरी रंगाचा जास्त प्रभाव’

‘काला’मध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी, नाना पाटेकर, अंजली पाटील या मराठमोळ्या कलाकारांचीही वर्णी लागली आहे. ‘काला करिकालन’ या नावाविषयी दिग्दर्शकाला विचारलं असता, ‘या चित्रपटामध्ये तमिळ संस्कृतीचं चित्रण करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. या चित्रपटाच्या नावावरुन आता बऱ्याच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. सध्या रजनीकांत यांचे चित्रपसृष्टीसोबतच राजकीय वर्तुळातही वारे वाहत आहेत. त्यामुळे ते राजकारणात प्रवेश करणार का, याबाबतही तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South indian superstar upcoming movie rajinikanth starring kaala to hit the screens on april
First published on: 11-02-2018 at 16:12 IST