भारतातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून एसएस राजामौली यांना ओळखले जाते. ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट करणारे राजामौली सध्या एका व्हिडीओमुळे खूप चर्चेत आले आहेत. या व्हिडीओत एसएस राजमौली आपल्या पत्नीसह डान्स करताना दिसत आहेत.

‘सुरेश पीआरओ’ या एक्स अकाउंटवर राजामौली यांचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओत, राजामौली पत्नी रमा यांच्यासह थिरकताना दिसत आहेत. ऑस्कर विजेते एआर रेहमान यांच्या ‘अंदामैना प्रेमरानी’ या गाण्यावर दोघं डान्स करताना पाहायला मिळत आहेत. ‘प्रेमीकुडु’ या चित्रपटातील हे लोकप्रिय गाणं आहे. राजामौली यांचा हा ९ सेकंदाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

Sadabhau Khot on Raju Shetti
“राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढले नाही तर…”, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल; म्हणाले, “तुमचा गुलाम राहणार असं जयंत पाटलांना…”
Father & Daughter Emotional Video
“बापाची नजर कमजोर पण तो लेकीला..”, १०२ वर्षांच्या शेतकरी बाबाला ‘गंगाआई’ भेटली, Video पाहून डोळ्यातून येईल पाणी
Kangana Ranuat
“माझ्या बहिणीला कोणताही पश्चाताप नाही”, कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया
lokmanas
लोकमानस: ‘काजव्यां’ना यापुढेही जागे राहावे लागेल..
radhakrishna vikhe patil lose grip after mahayuti defeat in ahmednagar and shirdi seats
राधाकृष्ण विखे यांच्या वर्चस्वाला धक्का
This compiled edited part of the introduction to the book Shivarajyabhishek published on the 350th anniversary of Shiva Rajyabhishek
शिवराज्याभिषेकाला लोकमान्यांचे प्राधान्य!
Uddhav Thackeray Party symbol lok sabha Election 2024
‘असली’ कोण; ‘नकली’ कोण…!
Imtiaz Jaleel, Political conspiracy,
अब्दुल मालिक यांच्यावरील गोळीबारामागे राजकीय षडयंत्र – इम्तियाज जलील यांचा आरोप

हेही वाचा – लवकरच आई होणाऱ्या कार्तिकी गायकवाडचं घर आहे खूपच सुंदर, पाहा फोटो

दरम्यान, २००१ साली राजामौली यांनी रमा यांच्याशी लग्न केलं होतं. राजामौली हे जसे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, तसंच पत्नी रमा या प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिजाइनर आणि स्टाइलिस्ट आहेत. रमा राजामौली यांना सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाइनरचा नंदी अवॉर्ड मिळाला आहे. राजामौली यांच्या ‘मगधीरा’, ‘ईगा’, ‘बाहुबली: द बिगिनिंग’, ‘बाहुबली २: द कन्क्लूजन’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटातील पात्रांच्या वेशभूषेची जबाबदारी रमा यांनीच सांभाळली होती.

हेही वाचा – ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीची ‘साधी माणसं’ या नव्या मालिकेत जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ

राजामौली यांच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आरआरआर’च्या यशानंतर आता ते महेश बाबूसह चित्रपट करत आहेत. या चित्रपटाचं शीर्षक अजून निश्चित झालेलं नाही. ‘पीकॉक मॅगजीन’शी संवाद साधताना महेश बाबू म्हणाला होता की, सध्या माझं लक्ष एसएस राजामौली यांच्याबरोबर करत असलेल्या मोठ्या चित्रपटाकडे आहे. हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण होतं असल्यासारखं आहे.