दिग्दर्शक अनुराग कश्यप कायमच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. गेले काही दिवस माध्यमांपासून थोडा दूर असलेला अनुराग ‘दोबारा’ या त्याच्या सध्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने बोलताना सध्या हिंदी चित्रपटांना मिळणारे अपयश, धर्मा-यशराजसारख्या मोठमोठया निर्मिती संस्थांची तिकीटबारीवरची नामुष्की या विषयांवर रोखठोक मतं त्याने व्यक्त केली आहेत. बॉलीवूडची ‘स्टार’ व्यवस्था मला कधीच आवडली नाही, असं सांगताना स्टार कलाकाराभोवती चित्रपट गुंफण्याची प्रथाच बंद करायला हवी, असं तो म्हणतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मला मुळातच या स्टार व्यवस्थेचा तिटकारा आहे. बाहेर हॉलीवूडमध्ये माव्र्हलसारखे स्टुडिओ फारसे लोकप्रिय नसलेल्या चरित्र अभिनेत्यांना घेऊन त्यांना संधी देतात. ‘टायटॅनिक’ चित्रपट आला तेव्हा केट विन्स्लेट आणि लिओनार्दो द कॅप्रिओ हे तथाकथित व्यावसायिक चित्रपटांचे कलाकार नव्हते. तीच गोष्ट ‘अवतार’च्या बाबतीतही म्हणता येईल. आपल्याकडे बरोबर याच्या उलटं चित्र असतं,’ असं म्हणत त्याने बॉलीवूडच्या या स्टार कलाकारांनाच चित्रपटात घेण्याच्या अट्टहासावर टीका केली. ‘आपल्याकडे जितका मोठा चित्रपट तितका मोठा कलाकार’ हे समीकरण ठरलेलं आहे. त्यामुळे त्या चित्रपटावर इतकं दडपण असतं. त्यापेक्षा आपले चित्रपट खरोखरच प्रदर्शित झाल्यानंतर दरदिवशी किती कमाई करतात, याचे निरीक्षण करणारी एक समान व्यवस्था असायला हवी, असा मुद्दा त्याने मांडला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star centric system in bollywood is dangerous directed anurag kashyap movie bollywood amy
First published on: 21-08-2022 at 00:05 IST