मालिकेमधून घराघरात पोहचलेल्या कलाकारांवर प्रेक्षक कायमच भरभरून प्रेम करत असतात. या कलाकारांच्या भूमिका चाहत्यांसाठी अगदी जवळच्या असतात. चाहत्यांना कायम खूश ठेवण्यासाठी तसंच त्यांचं मनोरंजन करण्यासाठी या कलाकारांना मोठी मेहनत घ्यावी लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवस रात्र शूटिंग करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अनेक कलाकार सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडत असतानाच पडद्यामागे देखिल कलाकारांची धमाल अविरतपणे सुरु असते. सोशल मीडियावरचं कोणतंही चॅलेंज असलं तरी ही कलाकारमंडळी मागे नसतात. नुकतंच या कलाकारांनी एका सुपरहिट तमिळ सिनेमातल्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरत नवं चॅलेंज स्विकारलं आहे. कलाकारांच्या या डान्सचे व्हिडीओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता आणि कार्तिक म्हणजेच अनघा अतुल आणि आशुतोष गोखले यांच पडद्यावर फार पटत नसली तरी पडद्यामागची या दोघांची केमिस्ट्री खरोखर वाखाणण्याजोगी आहे.दोघांनी ब्रेकमध्ये धमाल डान्स केलाय.

सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ढवळे मामी म्हणजेच किशोरी अंबिये सोशल मीडियावर खूपच सक्रीय असतात. त्यांनीदेखिल सरु, अंजी आणि अवनीसोबत या हटके गाण्यावर आपल्या हटके अंदाजात ठेका धरला. सहकुटुंब सहपरिवार मालिकेची ही लेडी गँग सध्या या गाण्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या टीमच्या उत्साहालाही तोड नाही. या मालिकेतील गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने आपल्या सहकलाकारांसोबत ठेका धरला. गिरीजा उत्त्तम नृत्यांगना आहे त्यामुळे या नव्या चॅलेंजमध्ये सहभागी होत तिने धमाल केली. गौरी प्रमाणेच मुलगी झाली हो मालिकेतील माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर देखिल यात मागे नव्हती. व्हिडिओमधील तिचा सोज्वळ अंदाज भाव खाऊन गेला.

सोशल मीडियावर व्हिडिओज भरभरुन व्हायरल होताना दिसत आहेत. मालिकांप्रमाणेच कलाकारांची पडद्यामागची धमाल प्रेक्षकांना आवडत आहे.

 

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah daily soap actors dance challenge on soth super hit song girija prabhu kpw
First published on: 11-03-2021 at 10:21 IST