कसा शूट झाला अंजी पश्याचा स्विमिंग पूल सीन; संपूर्ण टीमची पूलमध्ये धमाल

कॅमेरा मागचे निवडक क्षण पहा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने अनेकांच्या कुटुंबात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील अनेक कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. कौटुंबिक मालिका असल्याने या मालिकेच्या कलाकारांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केलीय.

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील अंजी आणि पश्याची जोडी तर चाहत्यांची फेव्हरेट जोडी बनलीय. दोघांमधील संवाद आणि केमिस्ट्री पाहायला चाहत्यांना कायम आवडतं. नुकतचं मालिकेच्या कथानकात अंजी आणि पश्यामध्ये जवळीक वाढताना दिसतेय. अंजी स्विमिंग पूल मध्ये पडते तेव्हा पश्या पाण्यात उडी घेत लगेचच तिला वाचवतो. यावेळी दोघांमध्ये जवळीक वाढते असं दाखवण्यात आलंय.

या मालिकेचं शूटींग करत असताना कलाकार कायम धमाल करताना दिसून येतात. पश्या आणि अंजीच्या स्विमिंग पूलच्या सिनच्या वेळीही अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुमार आणि पश्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे या दोघांनी चांगलीच धमाल केल्याचं पहायला मिळालं. स्विमिंगपूलच्या काठावर बसून कोमल मनसोक्त आनंद घेत होती.
या सिनसाठी मालितेच्या संपूर्ण टीमलाच स्विमिंग पूलमध्ये पाण्यात उतरावं लागलं होतं. मुंबईत उकाडा वाढताना दिसतोय. अशात ही टीम पाण्यात उतरुन शूटिंगचा आनंद घेताना दिसली.

सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत सुनील बर्वे, नंदिता पाटकर, किशोरी अंबिये, अमेय बर्वे अशी कलाकार मंडळी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Star pravah serial sah kutumb sah pariwar anji and pashya shoot in swimming pool full team having fun kpw