अभिनेता सुबोध भावे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याने लहान मुलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासाठी तो मजेदार गोष्टींचा खजाना घेऊन आला आहे.
सुबोध व्हिडीओच्या माध्यमातून लहान मुलांना छान छान गोष्टी सांगत आहे. यावेळी तो लेखक श्याम कुरळे यांची ‘मारुती आश्चर्यचकित का झाला?’ ही गोष्ट सांगणार आहे. ही एक विनोदी गोष्ट आहे.
नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो,
श्याम कुरळे यांची एक गंमतशीर गोष्ट मी घेऊन आलोय… “मारुती आश्चर्यचकित का झाला” ? आता विचार करा ज्या गोष्टीचं शीर्षकच इतकं विनोदी आहे ती गोष्ट सांगताना मला किती मज्जा आली असेल 🙂
.
.
Story Link – https://t.co/z6k2895qxz#SubodhDadaChiGoshta pic.twitter.com/8byxm3dBWo— Subodh Bhave (@subodhbhave) May 2, 2020
“नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो, श्याम कुरळे यांची एक गंमतशीर गोष्ट मी घेऊन आलोय… मारुती आश्चर्यचकित का झाला? आता विचार करा ज्या गोष्टीचं शीर्षकच इतकं विनोदी आहे ती गोष्ट सांगताना मला किती मज्जा आली असेल.” असे ट्विट करुन याबाबत त्याने आपल्या चाहत्यांना माहिती दिली. सोबधचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.