करोना व्हायरसचा प्रसार रोखता यावा यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला. या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक वस्तूंची खरेदी सोडता घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. सर्व शूटिंग अनिश्चित काळासाठी बंद आहेत. सर्वसामान्यांसोबत कलाकारसुद्धा घरी बसले आहेत. मात्र सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांच्या संपर्कात आहेत. घरी बसून काय करत आहोत याची माहिती हे सेलिब्रिटी सोशल मीडियावरून देत आहेत. मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे घरी बसून विविध मराठी चित्रपटांचा आस्वाद घेत आहे. म

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच त्याने जुना कृष्णधवल मराठी चित्रपट ‘अवघाची संसार’ पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने ट्विट करत लिहिलं, ‘जुना कृष्णधवल मराठी चित्रपट अवघाची संसार बघितला. राजा गोसावी, शरद तळवलकर, जयश्री गडकर, दामुअण्णा मालवणकर, इंदिरा चिटणीस आणि सर्व. इतकं निरागस काम करणं कधी जमेल आम्हाला? त्या काळात जन्मलो असतो तर अभिनय करायचा विचारही केला नसता. आमचं भाग्य की असे मराठी कलाकार आम्हाला लाभले.’

Video : जेव्हा अजयला मारण्यासाठी जमावाने घातला होता घेराव

जुन्या मराठी कलाकारांइतकं निरागस काम करणं कधी जमेल आम्हाला, असा प्रश्न सुबोधला हा चित्रपट पाहून पडलाय. तर सुबोधच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्याच्याही अभिनयाची प्रशंसा केली आहे. सध्याच्या काळातील तुम्ही दमदार अभिनेते आहात, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subodh bhave tweet on acting and career in marathi industry ssv
First published on: 02-04-2020 at 10:03 IST