Video: लग्नाच्या दोन महिन्यांमध्येच सुगंधा आणि संकेतमध्ये झाले भांडण?

सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

social media , commedian , sugandha mishra , sanket bhosale , funny couple , video viral , social media
२६ एप्रिल रोजी त्यांनी लग्न केले.

लोकप्रिय कॉमेडियन आणि गायिका सुगंधा मिश्राने दोन महिन्यांपूर्वी संकेत भोसलेशी लग्न केले. दोघेही ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये काम करत होते. त्यांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. आता सध्या सोशल मीडियावर संकेत आणि सुगंधाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे भांडताना दिसत आहेत.

सुगंधा आणि संकेत हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत त्यांचे मजेशीर व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता त्यांच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. पण त्यांचे हे खरे भांडण झालेले नाही. सुगंधा आणि संकेतचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की हसू अनावर होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@sugandhamishra23)

सुगंधाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुगंधा संकेतला बोलताना दिसते की “जेव्हा अक्कल वाटली जात होती तेव्हा तू कुठे होतास?” त्यावर मजेशीर अंदाजात उत्तर देत संकेत म्हणतो की “मी तुझ्यासोबत सात फेरे घेत होतो.” संकेत आणि सुगंधामधील हे भांडण पाहून सर्वांना हसू अनावर झाले आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुगंधाने ‘कपलमधील भांडणे’ असे कॅप्शन दिले आहे.

सुगंधा आणि संकेत हे कपिल शर्मा शोमध्ये एकत्र काम करताना दिसत होते. त्यानंतर अनेकदा एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसले होते. पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्यावर उघडपणे वक्तव्य केले नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे साखरपुडा झाल्याचे सांगितले होते. तसेच २६ एप्रिल रोजी त्यांनी लग्न केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sugandha mishra and sanket bhosale funny couple fight video avb