वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांची मुख्य भूमिका असलेला ‘सुई धागा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा आणखी एक पोस्टर प्रदर्शित झाला असून ममता आणि मौजी या भूमिकेतील अनुष्का- वरुण लक्ष वेधून घेत आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने हा फोटो शेअर केला असून येत्या २८ सप्टेंबर रोजी ‘सुई धागा’ प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे.

‘यश राज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत येणाऱ्या या चित्रपटात वरुण टेलरची तर अनुष्का भरतकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरत कटारिया करत आहे. ‘मेक इन इंडिया’चा प्रचार या चित्रपटातून करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

वाचा : मराठी चित्रपट ‘चुंबक’वर राजकुमार हिरानी यांची स्तुतीसुमने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाची कथा काय असणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. ‘सुई धागा’च्या निमित्ताने वरुण आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. वरुण आणि अनुष्काने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा यातील भूमिका अत्यंत वेगळ्या असणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे.