scorecardresearch

अमित शाहांचा नंबर स्पूफ करून फोन आणि जयललितांचा नातेवाईक असल्याचा दावा; चंद्रशेखरने जॅकलीनला कसे फसवले?

सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबत मैत्री करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाचा नंबर स्पूफ करत फोन केला होता

Sukesh chandrashekhar spoof union minister amit shah office number to actress Jacqueline Fernandez

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाचा नंबर वापरुन आणि स्वत:ला जयललिता यांचे नातेवाईक असल्याचे सांगत सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत ओळख केल्याचे समोर आले आहे. या भेटीची संपूर्ण कहाणी आता समोर येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हटले आहे की सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबत मैत्री करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाचा नंबर स्पूफ करत फोन केला होता. तसेच त्याने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या राजकीय घराण्यातील असल्याचा दावा केला आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती दिली आहे. ‘कॉल स्पूफ’ म्हणजे जेव्हा फोन वाजतो तेव्हा कॉलरचा खरा नंबर नाही तर दुसऱ्याचा नंबर दिसतो.

ईडीने दोनदा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे जबाब नोंदवले ज्यात तिने म्हटले की चंद्रशेखर यांनी स्वत:ची ओळख शेखर रत्न वेला अशी सांगितली होती. ईडीने काही दिवसांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले होते आणि चंद्रशेखर, पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर सहा जणांची नावे दिली होती. तपास यंत्रणेने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची या वर्षात दोनदा चौकशी केली आहे.

चंद्रशेखर डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान अभिनेत्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, असे एजन्सीकडून सांगण्यात आले. मात्र अभिनेत्रीने चंद्रशेखरला उत्तर दिले नाही. चंद्रशेखरने अभिनेत्रीला अनेकदा फोन केला पण जॅकलीन या व्यक्तीच्या ओळखीबद्दल शंका होती आणि तिने त्याच्यासोबत संवाद साधला. ईडीने सांगितले की, अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टला सरकारी कार्यालयातून फोन आला होता. तिला सांगण्यात आले की जॅकलीनने शेखरच्या संपर्कात रहावे कारण तो एक महत्त्वाचा व्यक्तिमत्व आहे आणि त्याला तिच्याशी संवाद साधायचा आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलीनने नंतर शेखरशी संपर्क साधला. शेखरने त्यावेळी स्वतःला ‘सन टीव्ही’चा मालक असल्याचे सांगितले होते. त्याने जॅकलिनला सांगितले की तो माजी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या कुटुंबातील आहे आणि चेन्नईत राहतो. त्याने अभिनेत्रीला सांगितले की तो तिचा मोठा चाहता आहे आणि तिला दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी घ्यायचे आहे. सन टीव्हीचे अनेक प्रोजेक्टसुद्धा सध्या सुरू आहेत असेही त्यांनी सांगितले. ईडीच्या म्हणण्यानुसार, गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाचा नंबर स्पूफ करुन जॅकलिनच्या मेकअप आर्टिस्टला फोन केला होता. यानंतर मेकअप आर्टिस्टने चंद्रशेखरचा नंबर जॅकलिनला दिला आणि त्यानंतर ही ती त्याच्या संपर्कात आली

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sukesh chandrashekhar spoof union minister amit shah office number to actress jacqueline fernandez abn

ताज्या बातम्या