‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्याने खरेदी केली नवी कार

अभिनेत्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. जयदीप ही भूमिका अभिनेता मंदार जाधवने साकराली आहे. आता मंदारने एक महागडी गाडी खरेदी केली आहे.

मंदार हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने खरेदी केलेल्या मर्सिडिज गाडीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने छान असे कॅप्शन दिले आहे.

मंदारच्या या फोटोवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक कलाकारांनी कमेंट अभिनंदन असे म्हटले आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असते’ या मालिकेतील मंदारची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे. तसेच ही मालिका टीआरपीच्या यादीमध्ये देखील असल्याचे पाहायला मिळते. जयदीप आणि गौरीचा रोमॅन्स प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे. या मालिकेत वर्षा उसगावकर, गिरिजा प्रभू, माधवी नेमकर हे कलाकार भूमिका साकारताना दिसतात. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sukh mhanje nakki kay asta actor mandar jadhav buys a swanky new car avb

ताज्या बातम्या