..तर ‘धडकन’चा क्लायमॅक्स असता वेगळा; १९ वर्षांनंतर शिल्पा शेट्टीनं केला खुलासा

‘धडकन’ची सुपरहिट जोडी शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी ‘सुपर डान्सर’ या रिअॅलिटी शोच्या मंचावर एकत्र आले.

dhadkan
'धडकन'

जवळपास १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘धडकन’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला होता. सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. ‘धडकन’ची सुपरहिट जोडी शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी ‘सुपर डान्सर’ या रिअॅलिटी शोच्या मंचावर एकत्र आले. यावेळी त्यांनी चित्रपटातील बऱ्याच आठवणी शेअर केल्या. तर शिल्पाने ‘धडकन’च्या क्लायमॅक्सबाबत एक खुलासा केला.

‘धडकन’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी तब्बल पाच वर्ष लागली होती. यामागचं कारण शिल्पाने सांगितलं, ‘दिग्दर्शक धर्मेश यांना तीन महिन्यांत चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करायचं होतं. मात्र सुनील त्यावेळी दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. म्हणून सुनीलच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला घेण्यात आलं. पण तो अभिनेता या भूमिकेसाठी सुनीलइतका योग्य वाटत नाही हे समजल्यावर धर्मेश यांनी शूटिंग थांबवलं. पुन्हा सुनीलला घेऊन चित्रपटाची शूटिंग पूर्ण करण्यात आली. असं करता करता शूटिंग पूर्ण व्हायला तब्बल पाच वर्ष गेली.’

सुनील शेट्टीला या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. देव ही भूमिका फक्त सुनीलसाठीच बनली होती असंही शिल्पानं सांगितलं. यावेळी चित्रपटाच्या क्लायमॅक्सविषयी शिल्पाने खुलासा केला की, ‘धडकनचा क्लायमॅक्स वेगळाच होता पण चित्रपटाचा शेवट गोड व्हावा म्हणून तो बदलण्यात आला. अंजली देवला सांगते की ती रामच्या बाळाची आई होणार आहे आणि त्यानंतर देवचा मृत्यू होतो. पण शेवट गोड करण्यासाठी अंजली रामच्या बाळाची आई होणार हे ऐकल्यावर देव महिमासोबत निघून जातो असं दाखवण्यात आलं.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suniel shetty aka dev was supposed to die in dhadkan climax reveals shilpa shetty on super dancer set

ताज्या बातम्या