सध्या बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो सतत व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. सध्या सुनील शेट्टीने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुनील सायकल चालवताना दिसत आहे.
नुकताच सुनील शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो सायकल चालवत आहे, त्याच्या पाळीव कुत्र्यांसोबत खेळत आहे. तसेच माशांना खाणं टाकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सुनील शेट्टी सध्या मिळालेला वेळ त्याच्या आवडत्या गोष्टी करण्यात घालवत आहे असे म्हटले जात आहे.
हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘हे जग किती सुंदर आहे’ असा सकारात्मक संदेश दिला आहे. सुनील शेट्टीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच हा व्हिडीओ सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवरील असल्याचे म्हटले जात आहे.
सुनील शेट्टी ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांची मजामस्ती पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.